भारतीय बार काऊंसिलने परदेशी वकिलांसाठी दारे बंद केली असतानाच ब्रिटनने मात्र भारतीय वकिलांना उद्योग क्षेत्रातील खटले चालवण्याची संधी देऊ केली आहे. इंग्लंड आणि वेल्सच्या सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करण्यासाठी वकिलांनी 'ट्रान्सफर टेस्ट' उत्तीर्ण करणे आवश्यक असते. ही परीक्षा देण्यासाठी भारतीय वकिलांना ब्रिटनमध्ये जाण्याची गरज नाही. ही टेस्ट पुढील वषीर् एप्रिलपासून दिल्ली आणि मुंबईत होणार आहे. वर्षातून दोनदा होणाऱ्या या परीक्षेसाठी सुमारे 22 हजार रुपये फी असेल. परीक्षा देणाऱ्यांच्या मागणीनुसार भविष्यात केंदांची संख्या वाढवण्यात येणार आहे. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना वकिलीचा किमान दोन वर्षांचा अनुभव आणि बार काऊंसिल ऑफ इंडियाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिकाधिक भारतीय वकिलांना प्रोत्साहन देणार असल्याचे ब्रिटनने म्हटले आहे. |
वकिलांसाठी..
भारतीय वकिलांसाठी उघडले ब्रिटनचे दार
Subscribe to:
Posts (Atom)